Contact for Advertising
26 October 2026
← Home
Sports Breaking News Super Admin 23 September 2026

देहूरोड श्री शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश

१९ वर्षांखालील कुस्ती - फ्रीस्टाइल वजन गटात श्री शिवाजी माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

देहूरोड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रिडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरीतील कै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथे शालेय जिल्हास्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धा मंगळवारी(ता.22) येथे पार पडल्या.
या स्पर्धेत फ्रीस्टाइल वजन गटात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या देहूरोड येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.
विद्यालयात इयत्ता १२ वीत शिकत असलेल्या वेदांत मंगेश भोईर याने ५७ किलो वजन गटात १९ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.
तर पृथ्वीराज प्रदीप बोडके याने ७९ किलो वजन गटात १९ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
दोन्ही खेळाडूंची विभागीय स्पर्धेकरता निवड झाली आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अँड. संदीप कदम, प्राचार्य संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .