Contact for Advertising
27 October 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 30 September 2026

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी शनिवारीही नामनिर्देशन पत्र स्वीकारणार- विभागीय आयुक्त शीतल तेली–उगले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक-२०२६

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकरिता उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर अशी आहे; येत्या शनिवारी (३ ऑक्टोबर रोजी) प्रशासकीय सुट्टी असली तरी उमेदवारांकडून सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतली जाणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली आहे.
३० सप्टेंबर अखेर एकूण
पदवीधर अर्ज वाटप ९६, व्यक्ती ५८,
शिक्षक अर्ज वाटप ७८, व्यक्ती ४३ आहेत.
तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून
नामनिर्देशन पत्र दि.30 सप्टेंबर रोजी
तानाजी मारुती नाईक (अपक्ष) ,
पुणे पदवीधर मतदारसंघ
नामनिर्देशन पत्र निरंक आहे.