Contact for Advertising
28 July 2026
← Home
Local Breaking News Super Admin 24 July 2026

वडिवळे धरणातून विसर्ग कमी तरीही सतर्क राहण्याचे आवाहन

वडीवळे धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे.

देहू:मावळ परिसरात शुक्रवारी(ता.24) सकाळी 6:00 वाजे पर्यंत वडीवळे धरण 98.38% भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात घट झाल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत घट होत असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी वडीवळे धरणाच्या ठीक सकाळी 6:00 वाजता सांडव्यावरील वक्रद्वारांद्वारे नदीपात्रामध्ये सुरू असणारे 6780 क्युसेक इतका विसर्ग ,कमी करून 3592 क्युसेक सुरू करण्यात येत आहे.
पाऊस सुरू राहिल्यास अथवा वाढल्यास तसेच धरणामध्ये येव्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास परिस्थितीनुसार सदर विसर्गामध्ये कमी अथवा जास्त बदल करण्यात येऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
तरी नागरिकांनी नाला अथवा नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रातील साहित्य, वाहने व जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. तसेच सखल भागातील नागरिकांना त्वरित सूचना देऊन सर्वांनी आवश्यक ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, दि. म. डुबल
पुणे पाटबंधारे विभाग यांनी केले आहे