Contact for Advertising
26 October 2026
← Home
Sports Breaking News Super Admin 27 September 2026

जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेत श्री म्हाळसाकांत विद्यालयातील प्रणव शिंपी विजयी

जिल्हास्तर तायक्वांडो आणि कुस्ती स्पर्धेत श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थ्यांना यश. विभागीय स्पर्धेसाठी निवड

पिंपरी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कनिष्ठ महाविद्यालय जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेत श्री म्हाळसाकांत विद्यालयातील प्रणव शिंपी याने 47 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच
कनिष्ठ महाविद्यालय जिल्हास्तर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत 82 किलो गटात मकरंद उकिरडे याने प्रथम क्रमांक मिळविला.
नववीतील वेदांत पाबळे याने 47 किलो गटात ग्रीको रोमन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला या तीनही खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
श्री म्हाळसाकांत विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे यांनी या खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. क्रीडाशिक्षक अशोक आवारी, शरद सस्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.