आकुर्डी: श्री म्हाळसाकांत विद्यालयातील व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील मार्च 2026 मध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या सनिल विनोद साळवे या विद्यार्थ्यास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे यांचे कडून राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त झाला आहे.
म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे, शाळेच्या पर्यवेक्षिका विभावती अभंग, लायन्स क्लब निगडी चे अध्यक्ष शिल्पी कुमार , डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन मेंटल हेल्थ अँड वेल बीइंग लायन रश्मी नायर , लायन अजित देशपांडे
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपप्राचार्य शशिकांत सात्रस, व्यवसाय शिक्षण विभाग प्रमुख सुभाष पाटील, शिक्षक मारुती खुटवड, दिनेश काळे, करण ताठे, लेखनिक अनिल जाचक, सचिन शितोळे, कर्मचारी मनोज टेकवडे यावेळी उपस्थित होते.
श्री म्हाळसाकांत विद्यालयातील विद्यार्थ्यी सनील साळवे यास राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार
राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार ही शासनाच्या समाज कल्याण व सामाजिक न्याय विभागाची योजना .इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते.