Contact for Advertising
11 September 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 10 September 2026

रघुवीर शेलार वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक असताना स्वच्छता मोहीम राबवून देहूरोड शहराला "देशातील सर्वात फास्टेस्ट मुव्हींग कॅन्टोन्मेंट" चा केंद्र सरकारचा पुरस्कार मिळवून दिला.

देहू : मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व ,श्रीक्षेत्र देहू-देहूरोड शहर मंडल, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे शुक्रवारी(ता.11)आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे जगद्गुरु संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात महापूजा व दर्शन, सकाळी नऊ वाजता अनाथ आश्रमात अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वा. या वेळेत सेंट जॉर्ज स्कूल, संत तुकाराम नगर
(थॉमस कॉलनी), देहूरोड येथे होणार आहे.
या शिबिरासाठी डॉ. अमित वाघ – स्पर्श हॉस्पिटल, सोमाटणे, डॉ. महेश कुदळे – आधार हॉस्पिटल, देहूरोड,
डॉ. जयेश कदम – जीवन रेखा हॉस्पिटल उपलब्ध राहणार आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या आजार व शस्त्रक्रियांचा मोफत उपचार वरील हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल.
मोफत तपासणी : इसीजी,उच्च रक्तदाब, मधुमेह (शुगर), थायरॉईड, पोटाचे विकार – डायरिया, अपचन, गॅस, अँसिडिटी, फुफ्फुसांचे विकार – दमा, न्यूमोनिया, टी.बी.
संसर्गजन्य आजार – डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड इ. कान, नाक, घसा विकार, रक्ताचे आजार,नेत्ररोग व डोळ्यांचे विकार, हाडांचे विकार – संधिवात, आमवात, गुडघेदुखी, मणक्याचे विकार, जुना सर्दी-खोकला यावर उपचार केले जाणार आहेत.
नाव नोंदणीसाठी आरोग्यदूत अनिल शेलार 9765979000
संपर्क साधावा.