Contact for Advertising
28 July 2026
← Home
Sports Breaking News Super Admin 13 July 2026

राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेमुळे हडपसरच्या नावलौकिकात भर -आमदार चेतन तुपे

पुणै ते बारामती राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सायकल स्पर्धेपूर्वी शनिवारवाड्यापासून रॅली. मुख्य स्पर्धेला हडपसर येथून सुरूवात.. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धक सहभागी.

पुणे: पुणे बारामती या राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धेचे मुख्य उद्घाटन हडपसर येथे होत असून ही स्पर्धा हडपसर येथील महत्त्वाची क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेमुळे हडपसरच्या नावलौकिकात भर पडत आहे. यापुढे स्पर्धेची जागतिक स्तरापर्यंत व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे यानी हडपसर येथे केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे भूतपूर्व अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी(ता.22) राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ही क्रीडा स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सकाळी ९.०० वा. हडपसर (ग्लायडिंग सेंटर) होणार असून येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.या स्पर्धेच्या नियोजनाची आढावा बैठक अण्णासाहेब मगर महाविद्यालयात घेण्यात आली.त्यावेळी आमदार तुपे बोलत होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, राष्ट्रवादी काँग्रेस महारष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी उपमहापौर निलेश मगर, हडपसर अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे, सुनील बनकर, फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचे अध्यक्ष संतोष सरोदे, नगरसेवक अजित घुले, फारूक इनामदार, ओंकार कामठे, भरत झांबरे, महिला अध्यक्षा वैष्णवी सातव, सुजाता कटके, सोनाली घुले, शबाना शेख, वामन घाडगे, योगेश सूर्यवंशी, मनोज घुले, कलेश्वर घुले, संजय घुले, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य अशोक भोसले, प्राचार्य आर.वाय. पाटील, प्राचार्य आश्विनी शेवाळे, प्राचार्य डॉ. रंजना पाटील, डॉ. रितेश पाटील, डॉ. योगेश पवार व इतर उपस्थित होते.

स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. ही स्पर्धा चार गटात घेतली जाते. त्यामध्ये १२२ किलोमीटरची पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तर, सासवड ते बारामती ही ८५ किलोमीटरची पुरूषांसाठी खुली एमटीबी सायकल राज्यस्तरीय आणि खास महिलांसाठी माळेगाव ते बारामती ही १५ किलोमीटरची राष्ट्रीय सायकल स्पर्धा होणार आहे.
आमदार चेतन तुपे म्हणाले, पुणे बारामती या राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धेचे योग्य नियोजन करू.उद्घाटन हडपसर येथे होत असून जास्तीत जास्त स्पर्धेत यात सहभागी होतील.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम यांनी सांगितले, सायकल स्पर्धेमध्ये देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ४०० ते ४५० सायकलपटू सहभागी होणार असून पारितोषिके व सहा लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकास राज्य व राष्ट्रीय स्तरावर "घाटाचा राजा" हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्व गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्पर्धकांना रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी शनिवारवाडा ते हडपसर या दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून पर्यावरण संदेश, प्रदूषण, स्वच्छता, वाहतूक याबाबत जनतेला संदेश दिला जाणार आहे. सदर रॅली ही सर्वांसाठी खुली असून त्यामध्ये ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रशांत मुळे यांनी सूत्रसंचालन केले . अमर तुपे यांनी आभार मानले.