Contact for Advertising
28 July 2026
← Home
Sports Breaking News Super Admin 12 July 2026

पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन -पु.जि.शि.मंडळ उपक्रम

स्पर्धा चार गटात . 122 किलोमीटर पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तर. सासवड ते बारामती 85 किलोमीटर पुरूषांसाठी खुली राज्यस्तरीय एमटीबी स्पर्धा . महिलांसाठी माळेगाव ते बारामती 15 किलोमीटर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित.

पुणे: माजी उपमुख्यमंत्री, ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलैला पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीया नवी दिल्ली आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम यांनी केले आहे,
अ‍ॅड. संदीप कदम यांनी सांगितले, स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. ही स्पर्धा चार गटात घेतली जाते. त्यामध्ये 122 किलोमीटरची पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तर, सासवड ते बारामतीही 85 किलोमीटरची पुरूषांसाठी खुली राज्यस्तरीय एमटीबी स्पर्धा आणि खास महिलांसाठी माळेगाव ते बारामती ही 15 किलोमीटरची राष्ट्रीय स्पर्धा होते.
प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह दिले जाते. तसेच दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घाटाचा राजा हा मानाचा पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेसाठी देशभरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील 450 स्पर्धक सहभागी होत असतात. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे इच्छूकांनी सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन आपली नावनोंदणी करावी. तसेच याबाबत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संजय साठे (7972189670) आणि डॉ. योगेश पवार (9850952787) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अ‍ॅड. कदम यांनी केले.सोबत दिलेल्या क्यूआर कोड वर
नोंदणी करा.