Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 24 October 2026

बाबुरावजी घोलप विद्यालयात स्कॉलरशिप व NMMS परीक्षार्थींना मोफत पुस्तकांचे वाटप

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

सांगवी : बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ तसेच इयत्ता आठवीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त मार्गदर्शक पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी कासारसाई येथील उद्योजक गणेशभाऊ शेडगे, दारुंब्रे येथील उद्योजक नितीन ढमाले आणि कासारसाई येथील उद्योजक सचिन पवार यांनी पुस्तके उपलब्ध केली. तसेच कासारसाई येथील कुमार खोले यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व NMMS परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन आणि परीक्षेच्या तयारीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले आणि पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघमारे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य अजिनाथ ओगले म्हणाले, “योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि दर्जेदार मार्गदर्शक पुस्तकांचा प्रभावी वापर केल्यास शिष्यवृत्ती व NMMS परीक्षांमध्ये यश संपादन करणे शक्य आहे. दानशूर व्यक्तींनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले सहकार्य त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल.”