Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 15 October 2026

सरकार हरले आणि एमपीएससी विद्यार्थ्यांनी विवेकानं आंदोलन जिंकले

एमपीएससी आंदोलनामुळे समाजात अनेक असे युवक आहेत जे विद्यमान राज्यकर्त्यांपेक्षा चांगला कारभार करू शकतात हे विवेकानंदांच्या रूपाने समोर आले आहे

देहू : एमपीएसीतील पेपर फुटी घोटाळा प्रकरणी पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना काय मिळालं आणि समाजाला काय मिळालं याबाबत चर्चा होणं गरजेचे आहे.काहीजण हे आंदोलन फसले , गुंडाळले असे बोलतात.तर काहीजण यश मानतात.अनेकांची मते वेगळी आहेत .मात्र यातील एकच सार आहे.सरकार हरले आणि एमपीएससी विद्यार्थ्यांनी विवेकानं आंदोलन जिंकले.
याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात.
1.आंदोलनाची तशी ही योग्यच वेळ होती. मागील काही दिवसांपासून सतत पेपर फुटी प्रकरणे समोर येत होती. प्रामाणिकपणे परिस्थितीवर मात करत विद्यार्थी अभ्यास करत असतात.अभ्यासिका फी, क्लास फी, मेसचा खर्च ,राहण्याचा खर्च, शैक्षणिक साहित्य खर्च याचे आर्थिक नियोजन करणे तर दुसरीकडे परीक्षा झाली. पण कट ऑफ जास्त लागला हे विसरून पुढच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवतो. तर आर्थिक देवाणघेवाण करून कोणीतरी आपली जागी जाऊन बसलं. तेव्हा निराश होण्याव्यतिरिक दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो.पण कालच्या यशस्वी आंदोलनाने आशा पल्लवीत झाल्या आहेत. तुकाराम मुंढे यांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची चौकशी समितीच्या सचिव पदी नेमणूक झाली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी व आयोगाच्या नवीन समिती ने प्रामाणिकपणे काम करून होतकरू विद्यार्थ्यांना अधिकारी होण्यासाठी मार्ग सुकर करून द्यावा, ही माफक अपेक्षा.
प्रकाश कांबळे
संचालक यशस्वी अभ्यासिका देहू .
----------‐-‐
2. विद्यार्थी उराशी एक स्वप्न, ध्येय बाळगून या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असतो. मात्र, आज तोच विद्यार्थी त्याच्या येणाऱ्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. NEET, MPSE ,SSC,... अश्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे याला कुठेतरी आळा घालण्यात यावा. आंदोलन हे फक्त एखाद्या व्यक्तीचा राजीनामा घेण्यासाठी नाही तर येणाऱ्या काळात असा गैरप्रकार होऊ नये यासाठी आहे.
वेदांत पाटील
नीट परीक्षा विद्यार्थी.
‐-----------

3. चौकशी समितीत तुकाराम मुंढे साहेब आहेत. त्यांच्यावर बिनधास्तपणे विश्वास टाकून विदयार्थी पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागले आहेत.
या पुढील परीक्षा विदयार्थी हिताचा, कष्टाचा, मानसिकतेचा आणि विश्वासाचा विचार करून पारदर्शकपणे पार पाडाव्यात एवढीच माफक अपेक्षा. 'जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे या ओळी प्रमाणे विदयार्थी होऊनच त्यांच्या भावना समजतील. विदयार्थ्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव असू दयावी.
चंद्रभागा चौधरी
स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनी
‐----------
4."सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता!" या संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा खरा वारसा आज पुण्याच्या रस्त्यांवर लढणारा प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी चालवत होता. हा लढा केवळ एका परीक्षेचा किंवा सरकारी नोकरीचा नाही, तर लाखो तरुणांच्या भविष्याचा आणि हक्काचा आहे.
जेव्हा संपूर्ण व्यवस्था चुकीच्या गोष्टींनाच 'नियम' मानून गप्प बसते, तेव्हा त्या 'बहुमताला' नाकारून सत्याच्या बाजूने उभे राहणे हीच आजच्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे. ऋषी गांगुर्डे यांनी जीवाची पर्वा न करता, लाखो रुपयांची आमिषे धुडकावून पेपरफुटीचा घोटाळा चव्हाट्यावर आणला आणि विवेकानंद पाटील यांनी आपल्या आक्रमक वाणीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वेदनांना मुख्य व्यासपीठ मिळवून दिले.या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून नव्हे तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.आयोगाने (MPSC) पूर्ण पारदर्शकता, वेळेत परीक्षा आणि दोषींवर कठोर कारवाई याबाबत ठोस पावलं उचलली पाहिजेल.कारण हा प्रश्न आता केवळ विद्यार्थ्यांचा राहिला नसून पूर्ण पिढीच्या अस्तित्वाचा लढा बनला आहे!
अर्जुन लांब
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी.
-------'
5. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी हा आता जागा झाला आहे. अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी तो आता सक्षम झाला आहे.आयोगाची निवड प्रक्रिया ही पारदर्शक असावी. कालच्या आंदोलनातून योग्य ते धडे आयोगाने घ्यावे व अमुलाग्र बदल आपल्या समितीमध्ये करावे.
डॉ.ओंकार
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी.
6.विद्यार्थ्याच्या यशाची अपेक्षा फक्त तो एकटाच नाही तर त्याचे आई वडीलही करत असतात.
स्पर्धा परीक्षे कडे विद्यार्थी मोठ्या अपेक्षा घेऊन येत असतो आणि त्यात यश संपादन करणे खूप अवघड आहे हे माहिती असूनही तो ती हिम्मत करतो पण अशा घटना नंतर तो खरच तुटून जातो.
आंदोलनाच्या माध्यमातून तात्पुरता राजीनामा जरी घेतला असेल तरी तो ह्या समस्येचा उपाय नाही

शुभम मांढवे
-------