Contact for Advertising
26 October 2026
← Home
Sports Breaking News Super Admin 19 October 2026

श्री म्हाळसाकांत विद्यालयातील दीक्षा अवघडे कराटे स्पर्धेत जिल्हास्तरावर विजयी

अकरावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या दीक्षा हिने ६७ किलोवरील वजनगटात सहभाग घेत जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.

आकुर्डी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील कनिष्ठ महाविद्यालयीन मुलींच्या १९ वर्षांखालील गटातील शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी दीक्षा अवघडे हिने उल्लेखनीय कामगिरी केली.
इयत्ता अकरावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या दीक्षा हिने ६७ किलोवरील वजनगटात सहभाग घेत जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
दीक्षाच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे, उपप्राचार्य शशिकांत सात्रस, क्रीडा विभागातील शिक्षक शरद सस्ते, विनायक बिरांजे व विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.