Contact for Advertising
26 October 2026
← Home
Health Breaking News Super Admin 02 October 2026

देहू इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियान

इंद्रायणी नदी व घाट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा आणि नदीपात्रात कचरा टाकू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले

देहू : महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त देहू नगरपंचायत, अखिल विश्व गायत्री परिवार पुणे आणि ‘नमामी इंद्रायणी’ सेवा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 2) इंद्रायणी घाट परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात नमामी इंद्रायणी सेवा अभियान प्रमुख सोमनाथ मुसुडगे, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे , शैलेंद्र पटेल, शैलेश चव्हाण , नगरपंचायत च्या आरोग्य विभाग प्रमुख कविता पाटील , रोहित श्रीवास्तव, गायत्री परिवाराचे पदाधिकारी तसेच वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी सपकाळे यांच्यासह नागरिक व स्वयंसेवक सहभागी झाले होते .
देहू मध्ये हजारो वारकरी दररोज इंद्रायणी घाटावर येतात. त्यामुळे घाट परिसर स्वच्छ ठेवावा ,असे आवाहन सोमनाथ मुसुडगे यांनी यावेळी केले.
इंद्रायणी नदी व घाट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा आणि नदीपात्रात कचरा टाकू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.