Contact for Advertising
11 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 10 September 2026

देहूत गणेशोत्सव मंडळांची शुक्रवारी बैठक- देहूरोड पोलिसांचे आयोजन

या बैठकीत डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

देहू: देहू परिसरातील सर्व गणेशोत्सव सण साजरा करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी , शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य यांची शुक्रवारी (ता.11) सायंकाळी साडेचार वाजता देहूतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरात बैठक आयोजित केलेली आहे .या बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन देहूरोड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे देहू मधील विविध गृह प्रकल्पातील आणि सोसायटी मधील गणेशोत्सव साजरे करणाऱ्या मंडळांनीही बैठकीस उपस्थित राहावे असे आव्हान श्री. बनसोडे यांनी केले आहे.