Contact for Advertising
11 September 2026
← Home
Local Breaking News Super Admin 22 August 2026

देहू वीज समस्येवर तोडगा काढावा- ग्राहकांची मागणी

शनिवारी(ता.22) आनंद टेक्सटाइल शोरुम समोरील विजेच्या डीपी मध्ये पहाटे ३ वाजल्यापासून जाळ होऊन,आवाज करत डिपी बॉक्स जळण्याचा प्रकार घडला. परिसरात आवाज आल्यामुळे नागरिकांनी त्वरित सावधगिरी बाळगली.

देहू: देहू परिसरात वारंवार वीज पुरवठा समस्या निर्माण होत असल्याने अनेक नागरिक त्रस्त झालेले आहेत. वीज वितरण कंपनीने यावर त्वरित उपाययोजना कराव्यात ,अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. शनिवारी(ता.22) पहाटे आनंद टेक्सटाइल शोरुम समोरील विजेच्या डीपी मध्ये पहाटे ३ वाजल्यापासून जाळ होऊन,आवाज करत
डिपी बॉक्स जळत आहे. परिसरात आवाज आल्यामुळे नागरिकांनी त्वरित सावधगिरी बाळगली. वीज वितरण कंपनीला या संदर्भात माहिती दिली . त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही.
त्याचप्रमाणे शिवशक्ती सोसायटी कडे जाणारी लाईन चा कंडक्टर तुटला. त्यामुळे वीज पुरवठा बंद करून ठेवण्यात आला होता.