देहूरोड : किवळे विकासनगर मधील साउथ इंडियन असोसिएशनचे शेठ एच. ए. बरलोटा मेमोरियल विझ्डम इंग्लिश मीडियम हायस्कूल (साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटी) आणि देहूरोड पोलीस स्टेशन च्या वतिने विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर कसे राहता येईल आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम यांचे मंगळवारी( ता. 28 ) मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे , पोलीस उपनिरीक्षक अक्षय जाधव , पोलीस हवालदार प्रशांत वाबळे , किशोर परदेशी व इतर उपस्थित होते.
प्रवीण मोरे यांनी विद्यार्थ्यांना नो टू ड्रग्स या कॅम्पिंग विषयी माहिती दिली .तसेच विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष जयशंकर जयसिंग, मुख्याध्यापिका गायत्री धामणेकर ,शेरीन कुरियन यांनी मार्गदर्शन केले.शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी अनंत ढोबळे आणि शैलेश मुळे यांनी कार्यक्रम सहकार्य केले. शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आईजा तांबोळी व कार्तिक कनाके यांनी अमली पदार्थ विरोधी मते मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका राधिका बक्षी यांनी केले.
विकासनगरमधील विझ्डम शाळेत ड्रग्स व त्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन
देहूरोड पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना ड्रग्स व त्याचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन . विद्यार्थ्यांनी घेतली शपथ नो ड्रग्स.