Contact for Advertising
28 July 2026
← Home
Local Breaking News Super Admin 07 May 2026

देहू पालखी रथाला बैल जोडी जुंपण्याची संधी द्यावी

आषाढी वारी मध्ये पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान शेतकऱ्यांना मिळत होता. मात्र हा मान गेल्या वर्षापासून बंद झालेला आहे. ती सेवा करण्याची संधी पुन्हा मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

देहू, :आषाढी वारीत
पालखी सोहळ्यातील रथाला बैल जोडी जुंपण्याचा मान स्थानिक शेतकऱ्यांना पुन्हा द्यावा अशी मागणी देहूतील शेतकरी मधुकर काळोखे यांनी संत तुकाराम महाराज संस्थान कडे निवेदनाद्वारे केली आहे.
पालखी सोहळा हा केवळ परंपरा नसून, तो श्रद्धा, अस्मिता आणि जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
या सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळणे, हे भाग्य मानले जाते. मात्र, २०२५ सालापासून बैल जोड्यांच्या व्यवस्थापनाचा निर्णय संस्थानमार्फत घेतला गेला. त्यामुळे गावातील शेतकरी या सेवेतून वंचित झाला असे शेतकरी मधुकर काळोखे यांनी निवेदनात म्हटले आहे.
संस्थान ने या निर्णयाचा पुन्हा विचार करावा आणि स्थानिक शेतकऱ्यांना पुन्हा या सेवेत सहभागी करून घ्यावे,अशी मागणी काळोखे यांनी केली.