Contact for Advertising
28 July 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 05 July 2026

देहूतील देऊळवाड्यात ग्लोबल वारीचे स्वागत

लंडनमधून आलेल्या ग्लोबल वारीचे देहूतील नागरिक आणि भाविकांकडून स्वागत करण्यात आले.संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेऊन वारी आळंदी कडे मार्गस्थ झाली.

देहू,: लंडनमधून आलेल्या ग्लोबल वारीचे रविवारी(ता.5 ) देहूतील देऊळवाड्यात
संत तुकाराम महाराज संस्थान, गाथा मंदिर,
जागतिक वारकरी संप्रदाय संघटना (USO Warkari)
भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात ग्लोबल वारीचे स्वागत केले.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे*, विश्वस्त वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे , गणेश महाराज मोरे , दिलीप महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे , ग्लोबल वारीचे संकल्पक अनिल खेडकर, गाथा मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग महाराज घुले व इतर उपस्थित होते.
ग्लोबल वारी ही वारकरी संप्रदायाचा विचार, संत साहित्य, नामसंकीर्तन आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचविण्याचा एक वैश्विक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध देशांतील वारकरी आणि विठ्ठलभक्तांना एकत्र आणण्याचे कार्य केले जात आहे.
ग्लोबल वारीचे संस्थापक अनिकेत महाराज मोरे यांनी आयोजन केले होते.