Contact for Advertising
28 July 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 25 July 2026

देहू आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी

देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पहाटेपासून देऊळवाड्यात भाविकांची गर्दी
देहू: आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात भाविकांनी शनिवारी(ता.२५) पहाटे पासून दर्शनासाठी गर्दी केली.टाळ मृदंग आणि विठुरायाच्या नामघोषात देहूनगरी दुमदुमली. देऊळवाड्यातील मुख्य मंदिरात विठ्ठलरुक्मिणीच्या दर्शनासाठी दर्शनबारीतून प्रवेश देण्यात आला. देहूरोड पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने परंपरेनुसार महापुजा करण्यात आली. धनंजय मोरे यांनी पौराहित्य केले.संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्याहस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. माळवाडी,विठ्ठलवाडी,येलवाडी,कान्हेवाडी,देहूरोड आणि विविध परिसरातील गावातील भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.संस्थान,मरकळ येथील लोखंडे आणि पुणे येथील बहिरट कुटुंबांच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.