देहू संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात अधिक मास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सूरू
संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने अधिक मास निमित्त पहाटेपासून महापूजा,भजन, कीर्तन महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.
देहू: संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने अधिकमास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तसेच देहूतील संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात येत आहे.देऊळवाड्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.पहाटेपासून भाविक दर्शनासाठी येत आहेत.