जाहिरातीसाठी संपर्क करा
02 June 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत 05 May 2026

देहू नगरपंचायत हद्दीत लाखो लिटर पाणी वाया

ऐन उन्हाळ्यात आणि पाणीटंचाई काळात देहूत लाखो लिटर पाणी वाया गेले.नागरिक आणि भाविकांकडून नाराजी व्यक्त.

देहू, : देहूतील परंडवाल चौक जवळील पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या पाईपलाईन चा वाल्व नादुरुस्त झाल्याने मंगळवार(ता.5)लाखो लिटर पाणी वाया गेले.ऐन उन्हाळ्यात आणि पाणीटंचाई काळात हा प्रकार घडल्याने नागरिक नाराज झाले आहेत.
विठ्ठलवाडी येथील पाणी टाकीतून परंडवाल चौक येथे एक लाईन येथे.पुलावर पाईपलाईन ला एक वाल्व आहे.हा वाल्व नादुरुस्त झाला होता.अचानक दाब वाढल्याने तो तुटला.त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.
याबाबत मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी सांगितले वाल्व ना दुरुस्त झालेला होता तो निघाल्याने पाणी वाया गेले मेन लाईन बंद केलेली आहे.