.देहू: दहिहंडी कार्यक्रमावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच मंडळांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहे ,अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी बुधवारी( ता.9 )दिली. डी.जे. चालक, मालक व कार्यक्रमाचे आयोजक तसेच कार्यक्रमाचे ठिकाणी अश्लील इशारे करून असभ्य वर्तन करणाऱ्या नृत्यांगणांवर देहूरोड पोलीसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी उच्च क्षमतेचे डी.जे., डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर लाईट व ध्वनी प्रदूषण करणारी साधने वापरण्यास बंदी, कार्यक्रमावेळी नृत्यांगणांकडून अश्लील हावभाव होवू नये, यावर बंदी असलेबाबत तसेच उत्सव व सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) व ३८ प्रमाणे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड कार्यालयाकडून मनाई आदेश जारी केलेले होते. तसेच मा. न्यायालयांचे आदेशानुसार ध्वनीक्षेपकांचा विहीत वेळेत व विहीत क्षमतेपेक्षा जास्त वापरावर बंदी असलेबाबत देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व दहीहंडी कार्यक्रम आयोजित केलेल्या सार्वजनिक मंडळांना वरील नियमांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत नोटीस जारी करून नियमांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत बैठका घेवून सुचना दिलेल्या होत्या.
मात्र देहूरोड पोलीस ठाणे हद्दीतील एम.बी. कॅम्प देहूरोड बाजारपेठ, तळवडे गावठाण, तळवडे या ठिकाणचे सार्वजनिक मंडाळांनी पोलीसांनी दिलेल्या नोटीसा तसेच मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले .
त्यांचेविरुध्द विविध कलमांन्वये एकुण चार वेगवेगळे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
दहिहंडी कार्यक्रमावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच मंडळांवरती गुन्हे दाखल
आगामी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन होणार नाही ,याची दक्षता घ्यावी , असे आव्हान देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.