Contact for Advertising
11 September 2026
← Home
Education Breaking News Super Admin 08 September 2026

प्राध्यापक प्रताप बामणे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्र राज्य मंडळ बालभारती मध्ये इ. दहावी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पाठ्यपुस्तक निर्मिती, करियर विषयक अंक लेखन ,संपादन, प्रकाशन, तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर संचालक पदावर कार्यरत.

आकुर्डी: येथील श्री.म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक प्रताप बामणे यांना एकलव्य फाउंडेशन च्या वतीने यंदाचा मानाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळात रसायनशास्त्र विषयात गेल्या पंचवीस वर्षापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत .
महाराष्ट्र राज्य मंडळ बालभारती मध्ये इ. दहावी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पाठ्यपुस्तक निर्मिती, करियर विषयक अंक लेखन , संपादन, प्रकाशन, तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर संचालक पदावर कार्यरत, विविध सामाजिक संघटनेवर कार्यरत आहेत . त्यांच्या विशेष योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला .यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ.एस .पी .लवांडे , दत्तात्रेय वारे , डॉ. सुधाकर जाधवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फाउंडेशनचे संस्थापक व मॉडर्न एज्युकेशनचे विश्वस्त प्राध्यापक सचिन सानप यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे व उपप्राचार्य शशिकांत सात्रस यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.