Contact for Advertising
02 June 2026
← Home
Education Breaking News Super Admin 06 May 2026

नेतृत्व विकास स्पर्धेत पोवार व आटोळे प्रथम

पुढील शैक्षणिक वर्षापासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या नावाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल अ‍ॅड. संदीप कदम

आकुर्डी, ता. 6 :

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि सोल ओमकार यांच्या वतीने आयोजित केलेल्या “विद्यार्थी व शिक्षक नेतृत्व विकास स्पर्धा २०२५–२६” आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत शहरी विभागात हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील शिक्षिका संध्याराणी आटोळे यांना प्रथम क्रमांक मिळाला. ग्रामीण विभागातून कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयातील शिक्षक दत्तात्रेय पोवार यांना प्रथम क्रमांक मिळाला.

या स्पर्धेत 32 शाळांमधून पहिली फेरी झाली. त्यातून अंतिम फेरीत 80विद्यार्थी व १६ शिक्षक होते.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य व संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून डॉ. ज्योती गोगटे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम ,सह सचिव ए. एम. जाधव, परिक्षा विभागाचे मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे , प्राचार्य भानुदास मालुसरे, उपप्राचार्य शशिकांत सात्रस ,डॉ .अमित देवकुळे व इतर उपस्थित होते.
अ‍ॅड. संदीप कदम यांनी सांगितले, ही स्पर्धा स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या नावाने यापुढे आयोजीत केली जाईल.
स्पर्धेत विजयी झालेल्या शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे - शहरी विभाग

1. संध्याराणी आटोळे - हडपसर - प्रथम क्रमांक
2. सुरेखा गुळवे - खराडी- इंग्लिश मीडियम - द्वितीय क्रमांक
3. शैली मिश्रा - Eon ग्यानांकुर - तृतीय क्रमांक

ग्रामीण विभाग -

1. दत्तात्रेय पोवार - कामशेत- प्रथम क्रमांक
2. ज्योती तरटे - पिरंगुट - द्वितीय क्रमांक
3.राजश्री बेल्हेकर - शेलपिंपळगाव - तृतीय क्रमांक
4. मीनाक्षी नरके - देहूरोड - उत्तेजनार्थ.