देहूरोड : महाराष्ट्र शासन वनविभाग, वन्यवृत्त पुणे आणि वनपरिक्षेत्र भांबुर्डा यांच्या वतीने श्री शिवाजी विद्यालयात शनिवारी (ता .3) वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल यादव, वन्यजीव अभ्यासक आदेश देसाई व त्यांचे सहकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जाधव, उपशिक्षक अरुण डिंबळे, दत्तात्रय सात्रस, किसन घोडे, वालु गांगुर्डे, तसेच उपशिक्षिका अनिता काळे, शितल कोकणे आणि प्रमिला काशीद उपस्थित होते.
१ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत देशभर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. यानिमित्त विद्यालयातील २५८ विद्यार्थ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यात आली.
वन्यजीवांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करणे, अडचणीत सापडलेल्या वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे, वन्यप्राणी बचाव पथकाशी संपर्क साधणे तसेच वन्यप्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात वन्यजीव संरक्षणाची जागृती निर्माण करण्याचा या उपक्रमामागील उद्देश होता.
वन्यजीव अभ्यासक आदेश देसाई यांनी चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरपटणारे प्राणी व इतर वन्यजीवांविषयी माहिती दिली. वन्यप्राण्यांबाबत असलेले गैरसमज दूर करताना त्यांच्याशी आपले वर्तन कसे असावे आणि वन्यप्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
देहूरोड: श्री शिवाजी विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात
अडचणीत सापडलेल्या वन्यप्राण्यांना वाचविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे, वन्यप्राणी बचाव पथकाशी संपर्क साधणे तसेच वन्यप्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले