जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 25 September 2026

देहू घरगुती गणरायाच्या मूर्तीचे दुपारी विसर्जन, इंद्रायणीचा काठ गणेश भक्तांनी फुलला

देहू नगरपंचायतच्या वतीने नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी गणेश मूर्तींचे संकलन त्यासाठी हौदाची निर्मिती

देहू: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती गेले गावाला चैन पडेना ,आम्हांला या घोषणा देत देहू परिसरातील घरगुती गणरायाचे मूर्तींचे वाजत गाजत आणि मिरवणूक काढत आबालवृद्धांनी इंद्रायणी नदीकिनारी विसर्जन केले.
देहू नगरपंचायत प्रशासनाने मूर्ती संकलनासाठी इंद्रायणी नदी काठावर विविध ठिकाणी होत निर्माण केले होते. त्यामुळे गणेश भक्तांनी इंद्रायणी नदीऐवजी या हौदामध्ये गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्याचे संकलन करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी मावळ आणि मुळशी तालुक्यातील 250 स्वयंसेवक इंद्रायणी घाटावर तैनात होते . त्यामुळे इंद्रायणी घाटावर कचरा झाला नाही. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गोळा केलेले निर्माल्याचे खत बनवण्यात येते . आणि ते खत प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण केलेल्या झाडांना पुरविण्यात येते, असे स्वयंसेवकांनी सांगितले.
दरम्यान देहूतील विठ्ठलवाडी, माळवाडी, झेंडेमळा ,चिंचोली परिसरातील नागरिकांनी घरगुती गणरायाचे दुपारी बारा वाजण्यापूर्वी विसर्जन केले.