जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
आरोग्य ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 01 October 2026

देहू द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस प्रोग्रामचे देहू येथे आयोजन

स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची हीच वेळ. द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस प्रोग्रामचे देहू येथे आयोजन

देहू : स्वतःवर अधिक प्रेम करणे, आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारणे, भावनिक स्थिरता मिळवणे, चिंता कमी करणे तसेच एकाग्रता आणि आनंद वाढविण्याच्या उद्देशाने द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस प्रोग्रामचे देहू येथे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये सुदर्शन क्रियेसह विविध श्वासोच्छ्वास तंत्रांचा अनुभव घेता येणार आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मक बदल आणि मानसिक प्रसन्नतेसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा कार्यक्रम ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण मुळशी धर्मशाळा, गाथा मंदिर रोड, भैरवनाथ चौक, देहूगाव हे आहे.
कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, नोंदणीसाठी aolt.in/1052891 या लिंकवर संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९३४४७९, ९६२३७८५०४८, ८६००००२४६२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकर नोंदणी करावी, असे आयोजकांनी सांगितले.