जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
क्रीडा ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 02 October 2026

टेनिक्वॉईट स्पर्धेत म्हाळसाकांत विद्यालयाची बाजी; जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक

हा खेळ बॅडमिंटन/व्हॉलीबॉलसारख्या कोर्टवर खेळला जातो, मात्र चेंडूऐवजी रिंग वापरली जाते.

आकुर्डी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील कनिष्ठ महाविद्यालयाच्या जिल्हास्तरीय 19 वर्षाखालील गटात टेनिक्वॉईट स्पर्धेत श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
या यशामुळे विद्यालयाच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे विद्यालयाच्या क्रीडा विभागाकडून कौतुक करण्यात आले असून, आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाने विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक शरद सस्ते यांनी मार्गदर्शन केले.
टेनिक्वॉईट हा रिंग वापरून खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. यात जाळीच्या (नेटच्या) दोन्ही बाजूंना खेळाडू असतात आणि रिंग प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टात टाकून गुण मिळवले जातात. हा खेळ बॅडमिंटन/व्हॉलीबॉलसारख्या कोर्टवर खेळला जातो, मात्र चेंडूऐवजी रिंग वापरली जाते.