देहू : जगद्गुरु संत तुकोबांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपसणारे खंबीर नेतृत्व,विकासात्मक व सर्वसमावेशक समाजकारण, नाविन्याचा ध्यास घेऊन वाटचाल करणाऱ्या,श्रीक्षेत्र देहूच्या कार्यक्षम माजी सरपंच,
मावळ तालुका महिला राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा, संत तुकाराम विद्यालय देहू स्कूल कमिटी सदस्या
सौ रत्नमाला ताई साहेबराव करंडे यांचा आज वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष व देहू ग्रामपंचायतचे माजी सदस्य संदिप वसंत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, सौ . रत्नमाला ताई करंडे या देहूच्या राजकारणातील महिला व युवकांचे आधारस्तंभ आहेत . तीर्थक्षेत्र देहू त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे .शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण देहूत पूर्ण केले. बी.कॉम. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी देहू मध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन करण्याचे काम केले .या कामातूनच त्यांनी पुढे देहू ग्रामपंचायत ची निवडणूक लढवली .त्यात त्या दोन वेळा यशस्वी झाल्या . एक वेळा देहूच्या सरपंचही झाल्या. तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना त्यांनी शासनाला अनेक विकासाची कामे सुचवली. देहूतील विकास आराखड्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे .तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ,स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि स्वर्गीय अजित दादा पवार यांचे त्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे. देहूतील अनेक समस्या संदर्भात त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि महाविकास आघाडीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
सौ रत्नमाला करंडे या नाविन्याचा ध्यास असणारे नेतृत्व- संदीप शिंदे
तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवताना त्यांनी शासनाला अनेक विकासाची कामे सुचवली. देहूतील विकास आराखड्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे .