देहू: सामाजिक भान आणि दुसऱ्यांना सतत मदत करण्याची वृत्ती असलेले राजेश प्रभाकर टिळेकर यांचा आज वाढदिवस आहे .सर्वसामान्या मध्ये साधेपणाने राहून सर्वांना समजून घेणाऱ्या या राजा माणसाबद्दल सर्वांच्या मनात आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा आहे .त्या राजा माणसाबद्दल.....
देहूरोड येथील लष्कराच्या मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिसेस मध्ये लेखनिक पदावर वयाच्या 25 व्या वर्षी कार्यरत होण्याची संधी राजेश टिळेकर यांना मिळाली. लहानपणीचे शिक्षण अत्यंत हलाखी आणि गरिबीच्या काळात पूर्ण केले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देहू येथे पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला . महाविद्यालयात शिक्षण घेताना राजकारणाची आवड होती. त्यामुळे 1990 ते 95 या काळामध्ये महाविद्यालयामध्ये यु .आर . आणि सी. आर. पदाची निवडणूक घेतली जात होती. मॉर्डन विद्यालयामध्ये त्यांनी सी.आर .पदी निवडणूक लढवून विजयी झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्कराच्या एम .ई.एस .मध्ये नोकरी मिळाली. शिक्षण घेताना जीवन जगण्याचे जे चटके मिळत गेले, त्यातून स्वतःला सावरत त्यांनी दुसऱ्याला सावरण्याची आणि मदत करण्याची वृत्ती जोपासली. याचाच एक भाग म्हणून एम.ई. एस .मध्ये ते गेले 22 वर्ष कामगार को-ऑपरेटिव सोसायटीमध्ये अध्यक्ष आणि सध्या सचिव पदावर सदन कमांड मध्ये कार्यरत आहे. देशभर फिरत असताना वेगवेगळ्या राज्यात त्यांना कामगार क्षेत्राचा अनुभव आला .कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील समस्या समजून घेऊन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून कुटुंबातील व्यक्तीला शिक्षण मिळाले पाहिजे ,व्यवस्थित जीवन जगता आले पाहिजे ,यासाठी कामगारांना आर्थिक मदत सोसायटीच्या माध्यमातून करत राहिले. त्याचप्रमाणे कामगारांच्या समस्या सरकार दरबारी मांडत राहिले .त्या सोडवण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे . दुसरीकडे आपले गाव आणि आपला परिसर यासाठीही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे .
आपल्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या आपल्या मित्रांना कधीही विसरलेले नाहीत .सतत त्यांच्या प्रति मदतीचा हात पुढे ठेवणारे राजेश टिळेकर हे मैत्रीतलाही राजा माणूस
आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .
देहू मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते .त्यावेळी इतर सरकारी पाहुण्यांची राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची त्यांच्या घरी सोय होती. त्यांनी महत्त्वाची भूमिका अत्यंत सुरेखपणे निभावून नेली. गावामध्ये पंतप्रधान आले आणि त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली याचा त्यांना मनोमन आनंद आहे.
आज देहूतील विविध समस्या लोकप्रतिनिधींबरोबर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार दरबारी मांडत आहेत. एकंदर आपले कुटुंब आणि आपला समाज यासाठी झटणाऱ्या राजेश प्रभाकर टिळेकर यांना वाढदिवसानिमित्त देहू ,माळीनगर परिसरातील नागरिक व देहू संतवाणी टीमच्या वतीने
||हार्दिक शुभेच्छा||
लेखक :
एम .डी .पी .
(श्री .राजेश टिळेकर यांचे लहानपणीचे मित्र आहेत.)
कामगार आणि कष्टकऱ्यांतील राजा माणूस -राजेश टिळेकर
कामगारांच्या हितासाठी झटणारा आणि देहू माळवाडी परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविणारा एक राजा माणूस म्हणून राजेश टिळेकर यांची ओळख आहे.