जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या एम.डी.पी. 23 October 2026

शिक्षक संघात ८५.८७ टक्के, तर पदवीधर संघात ६२.७८ टक्के मतदान

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी जाहीर;

पुणे : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या शुक्रवारी (ता. 23 )झालेल्या निवडणुकीत सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत झालेल्या मतदानात शिक्षक मतदारसंघात एकूण ६१ हजार ९४० मतदारांपैकी ५३ हजार १८५ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ८५.८७ टक्के आहे.
तर पदवीधर मतदारसंघात एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ६११ मतदारांनी मतदान केले असून, मतदानाची टक्केवारी ६२.७८ टक्के आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
शिक्षक मतदारसंघात पुणे जिल्ह्यात १६ हजार ८२२ मतदारांपैकी १३ हजार १३५ जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७८.०८ टक्के होती.
सोलापूर जिल्ह्यात १५ हजार ३०३ पैकी १३ हजार ६१९ मतदारांनी मतदान केले असून, ८९ टक्के मतदान झाले. सातारा जिल्ह्यात ९ हजार ४५४ पैकी ८ हजार ४५१ मतदारांनी मतदान केले. येथे ८९.३९ टक्के मतदानाची नोंद झाली.
सांगली जिल्ह्यात ८ हजार ६२ मतदारांपैकी ७ हजार ८१ जणांनी मतदान केले असून, मतदानाची टक्केवारी ८७.८३ टक्के आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १२ हजार २९९ पैकी १० हजार ८९९ मतदारांनी मतदान केले. येथे ८८.६२ टक्के मतदान झाले.
पदवीधर मतदारसंघात पुणे जिल्ह्यात ८८ हजार २०२ मतदारांपैकी ५४ हजार २२१ जणांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६१.४७ टक्के होती.
सोलापूर जिल्ह्यात ४९ हजार ७२२ पैकी ३५ हजार ५१३ मतदारांनी मतदान केले असून, ७१.४२ टक्के मतदान झाले. सातारा जिल्ह्यात ४७ हजार ४६३ पैकी ३१ हजार ७६४ मतदारांनी मतदान केले. ६६.९२ टक्के मतदानाची नोंद झाली.
सांगली जिल्ह्यात ८८ हजार ७० पैकी ४८ हजार ९८४ मतदारांनी मतदान केले असून, मतदानाची टक्केवारी ५५.६२ टक्के आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख १४ हजार ५६२ पैकी ७३ हजार १२९ मतदारांनी मतदान केले. येथे ६३.८३ टक्के मतदान झाले.
शिक्षक मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात ८९ टक्के, तर पदवीधर मतदारसंघातही सोलापूर जिल्ह्यात ७१.४२ टक्के मतदान झाले.