निगडी : मामुर्डी परिसरातील लिटील अर्थ, कोलते-पाटील सोसायट्या, कुणाल आयकॉनिया सोसायटी तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुमारे ७ ते ८ हजार नागरिकांना अद्याप नियमित पीएमपीएमएल बससेवेचा लाभ मिळत नाही. या परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी केली आहे .
याबाबत पीएमपीएमएलचे झोनल मॅनेजर, वाहतूक विभाग, निगडी येथील श्री. राजेश जाधव यांना निवेदन देण्यात आले.
मामुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले व लोकवस्ती वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या परिसरासाठी नियमित पीएमपीएमएल बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच विकासनगर, किवळे व पेंडसे कॉलनी येथील बसथांब्यांची दुरवस्था झाल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, रावेत येथील श्रीराम चौक – बाजी हॉटेल – सिल्वरस्टाईल सिटी – मानकर डोसा मार्गे निगडी या मार्गावरही पीएमपीएमएल बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांनी सांगितले, या बससेवा सुरू झाल्यास परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगारांना मोठा फायदा होणार असून सार्वजनिक वाहतुकीवरील अवलंबित्व वाढण्यास मदत होईल.
मामुर्डीतील ८ हजार नागरिकांसाठी बससेवेची मागणी- तंतरपाळे यांचे निवेदन
लिटील अर्थ, कोलते-पाटील व कुणाल आयकॉनिया परिसरात पीएमपीएमएल बस सुरू करण्यासाठी निवेदन