सांगवी: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य अजिनाथ ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली व रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण यांच्या वतीने 'इंटरॅक्ट क्लब'ची स्थापना आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या क्लबची निर्मिती करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तुळशी पूजनाने झाली. इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली कागदी फुले, तुळशीचे रोप आणि बीटच्या बिया देऊन उपस्थितांचे अनोखे स्वागत केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी:
अध्यक्ष : मयुरी मुगटकर, उपाध्यक्ष : कार्तिक बिडवे,
सचिव : यज्ञ गरुड, मेडिकल प्रेसिडेंट: मयुरी राजपूत,
संचालक : स्वरा महामुनी, कुणाल पांचाळ, ओजस्वी जाधव, कृष्णा सूर्यवंशी, पूर्वा वडके, विराज पोवार, विधी चटोले, भार्गव सौदाणे, प्रसन्न भोपळे, मोहम्मद फैजान तोसरअली.
शाळेचे प्राचार्य अजिनाथ ओगले यांनी शाळेच्या उपक्रमशीलतेची माहिती देत दूरवरून येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकली आणि प्राथमिक विभागातील मुलांसाठी खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी रोटरी क्लबकडे केली.
रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष रोटेरियन भूषण ढाके यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन व समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, यासाठी इंटरॅक्ट क्लबचे महत्त्व स्पष्ट केले. डायरेक्टर यूथ रोटेरियन अर्चना पांडे यांनी विद्यार्थ्यांना समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पिन प्रदान करून शपथ देण्यात आली.
या सोहळ्याला रोटेरियन श्रीकांत पांडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सारिका मुगटकर, उपाध्यक्ष श्री. कैलास बिडवे, उपप्राचार्य सौ. मेघा पोटे, पर्यवेक्षक श्री. चंद्रशेखर वाघमारे, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनिर्वाचित अध्यक्षा मयुरी मुगटकर हिने केले, तर आभार सेक्रेटरी यज्ञा गरुड हिने मानले.
सेवाभावातून नेतृत्वाकडे: बाबुरावजी घोलप विद्यालयात इंटरॅक्ट क्लबची स्थापना
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.