जाहिरातीसाठी संपर्क करा
11 September 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या प्रतिनिधी 07 September 2026

आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती संपन्न

इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे इंद्रायणी पूजन करण्यात आले. नदी घाटावर स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली.

आळंदी : येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आणि आळंदी देवस्थान तर्फे वेद मंत्र घोषात हरिनाम गजरात उत्साहात इंद्रायणी आरती झाली.
यावेळी इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे इंद्रायणी पूजन करण्यात आले. नदी घाटावर स्वच्छता करून रांगोळी काढण्यात आली. सामाजिक उपक्रम राबवित इंद्रायणी आरती आणि प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी

इंद्रायणी आरती सेवा समितीचे संयोजक अनिता झुजम, सरस्वती भागवत, लता वर्तले, ताई थोरवे, मीनाक्षी जरे, काशीबाई आडकीने, जयश्री भागवत, नीलम कुरधोंडकर, पुष्पा लेंडघर, महासंघ अध्यक्षा सुवर्णाताई काळे, स्वाती कांबळे, अश्विनी लिके, संपदा मेंडजोगी, विमल सकटे, इंदुबाई सरडे, सखुबाई मुंढे, सावित्री गायकवाड, तारामती गोरे, गोविंद ठाकूर यांचेसह भाविक, नागरिक इंद्रायणी नदी घाटावर उपस्थिती होते.