देहू: गणरायाच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने देहूच्या नगराध्यक्षपदी दुसऱ्यांदा संधी मिळाली. देहूच्या विकासासाठी या संधीचा उपयोग करूअसे प्रतिपादन देहूच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी सोमवारी(ता.14) देहू येथे केले.
गणेश चतुर्थी निमित्त देहू संतवाणी कार्यालयामध्ये संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे व पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, आनंदी विहार चे मालक व उद्योजक किरण बिरदवडे , लष्कराच्या एम. ई.एस. को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सचिव राजेश टिळेकर, येलवाडी गावचे माजी सरपंच नितीन गाडे, यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे, देहू गावचे पोलीस पाटील चंद्रसेन टिळेकर, देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा व संस्कृती सेलचे अध्यक्ष संदीप बाळासाहेब परंडवाल, सामाजिक कार्यकर्ते शैलेश चव्हाण ,संतोष टिळेकर, देहू संतवाणी चे संपादक वेदांत परंडवाल व इतर उपस्थित होते.
नितिन महाराज मोरे म्हणाले, वर्तमानपत्रे ही समाजाचा आरसा असतात . समाजातील घडलेल्या घटना तटस्थपणे मांडणे हे पत्रकाराचे काम असते .संत तुकाराम महाराज हे पहिले पत्रकार होते, असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण त्यांनी त्यांच्या अभंग वाणीतून परखड मते मांडलेली आहेत. आज ती समाजाला दिशा देण्याचे काम करतात.
पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले , देहू संतवाणी च्या माध्यमातून समाजातील विविध समाज उपयोगी कार्याची मांडणी लेखणीतून होत आहे.
माजी सरपंच नितीन गाडे कामगार को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव राजेश टिळेकर यांनी आपले विचार मांडले.
यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.
देहूच्या विकासासाठी कटिबद्ध- नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहू संतवाणी कार्यालयात आरतीचे आयोजन
वर्तमानपत्रे ही समाजाचा आरसा. समाजातील घडलेल्या घटना तटस्थपणे मांडणे हे पत्रकाराचे काम असते .संत तुकाराम महाराज हे आद्य पत्रकार.त्यांनी त्यांच्या अभंग वाणीतून परखड मते मांडलेली आहेत. आज ती समाजाला दिशा देण्याचे काम करतात - नितीन महाराज मोरे