जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 17 September 2026

प्रसारमाध्यमे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी -नंदकुमार काळोखे

बदलत्या हवामान विषयक आणि शेतीपूरक माहिती वर्तमानपत्रातून मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा .

देहू: प्रसार माध्यमांमुळे शेतीविषयक माहिती उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. शासनाच्या विविध योजना प्रसार माध्यमांमुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागलेल्या आहेत. तसेच बदलत्या हवामानाची माहिती प्रसार माध्यमांमुळे मिळते, असे प्रतिपादन देहू मजरे माळवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन नंदकुमार काळोखे यांनी बुधवारी (ता.16) देहू येथे केले.
गणेशोत्सवा निमित्त देहू संतवाणी कार्यालयामध्ये नंदकुमार काळोखे , उपाध्यक्ष शांताराम शेवकर ,प्रगतशील शेतकरी रवींद्र काळोखे ,यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांच्या हस्ते गणेश मूर्तीची आरती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते .
उपाध्यक्ष शांताराम शेवकर म्हणाले , सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून शेतकऱ्यांसाठी आणि शेती विषयक विविध योजनांची माहिती देण्यात आली पाहिजे. तसेच शेतीकडे चला हा संदेशही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी युवकांना दिला पाहिजे. गावातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या विकास सोसायटीचे कार्य कसे चालते हे युवकांनी आवर्जून पाहिले पाहिजे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी देहू मजरे माळवाडी विविध विकास सोसायटीचे रवींद्र काळोखे यांची मतदानासाठी मतदार प्रतिनिधी म्हणून सोसायटीच्या वतीने निवड करण्यात आलेली आहे. देहू संतवाणीचे वतीने रवींद्र काळोखे यांचा सत्कार करण्यात आला.
यशस्वी अभ्यासिकेचे संचालक प्रकाश कांबळे यांनी आभार मानले.
देहू मीडिया ग्रुप चे वेदांत परंडवाल यांनी स्वागत केले.