जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 01 October 2026

देहू गांधी जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन

विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिक्षण, साधेपणा तसेच गांधी विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता या विषयांवर आत्मविश्वासाने इंग्रजी भाषणे सादर

देहू : महात्मा गांधी जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधींचे विचार, सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम घेण्यात आले.
नर्सरी, एलकेजी व यूकेजीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा, समाजसुधारकांच्या वेशभूषा, गांधीजींच्या तीन माकडांवर आधारित कृती तसेच स्वच्छता उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींसह विविध समाजसुधारक व प्रेरणादायी व्यक्तींच्या वेशभूषा साकारून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता, शिक्षण, साधेपणा तसेच गांधी विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता या विषयांवर आत्मविश्वासाने इंग्रजी भाषणे सादर केली.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण व गुणदान माधवी अहिरराव, आशा चव्हाण आणि अश्विनी ढवणे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका रुक्मिणी थोरवे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंता हांडे व पूनम काळे यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख जयश्री धनगर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्कृष्ट पद्धतीने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारी” यांचा संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गांधी जयंतीचा कार्यक्रम आनंददायी, शैक्षणिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.