जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
क्रीडा ताज्या बातम्या एम.डी.पी. 22 October 2026

जिल्हा परिषद टेनिक्वाईट स्पर्धेत फोर-एस इंग्लिश मिडियम स्कूलचे यश

१७ वर्षांखालील मुलींच्या संघाला प्रथम क्रमांक; सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

देहू : जिल्हा परिषद आयोजित टेनिक्वाईट स्पर्धेत येथील फोर-एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर १४ आणि १७ वर्षांखालील मुलांच्या संघांनी तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर शाळेच्या सात खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. या संघातील शिवक्रांती वाडजे, एंजल शिंदे, भार्गवी गाडे, पूर्वा हगवणे, भूमी चौगुले आणि शिवानी मिश्रा या सहा खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
१४ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या गटातून विवेक कांबळे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच, १७ वर्षांखालील मुलांच्या संघानेही तृतीय क्रमांक पटकावला असून, या गटातून आयुष घोंसे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
खेळाडूंना शाळेच्या क्रीडाशिक्षिका सीमा भोसुरे यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. सुनील काळोखे, संचालक पवन सुनील काळोखे आणि मुख्याध्यापिका प्रणिता पवन काळोखे यांनी यशस्वी खेळाडूंचे व क्रीडाशिक्षिका सीमा भोसुरे यांचे अभिनंदन केले.