जाहिरातीसाठी संपर्क करा
11 September 2026
← मुख्यपृष्ठ
आरोग्य ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 10 September 2026

देहू गटारातील तुंबलेले सांडपाणी पालखी मार्गावर

पालखी मार्गावर सांडपाणी साचल्याने या चौकात उग्र घाणेरडा वास येत आहे तसेच पादचाऱ्यांना चालण्यास अडचण होत आहे.

देहू: देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकात गटारातील तुंबलेले सांडपाणी गुरुवारी (ता.10)सकाळी आल्याने पादचाऱ्यांची अडचण झाली. देहू नगरपंचायत प्रशासनाने त्वरित चौकातील तुंबलेली गटारे स्वच्छ करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
नुकतेच देहू शहर भाजप च्या वतीने देहू नगरपंचायत हद्दीतील विविध भागातील तुंबलेली गटारा संदर्भात निवेदन देण्यात आले होते. तसेच गटारे स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली होती .मात्र तीन दिवस होऊन गेले. देहू नगरपंचायतने याकडे लक्ष दिले नाही.
परंडवाल चौकातील देहू देहूरोड रस्त्यावर देहूच्या दिशे कडून येणारे गटार तुंबलेले आहे. या गटातील सांडपाणी सरळ रस्त्यावर आलेले आहे व चौकात साचले. या चौकामध्ये साचलेल्या पाण्याच्या शेजारी चहाचे दुकान व वडापाव सेंटर आहे .जोरात येणाऱ्या वाहनामुळे सांडपाणी या टपऱ्यांवर व तेथील नागरिकांच्या अंगावर पडत आहे. तसेच चौकात पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ही गटारे त्वरित स्वच्छ करावीत ,अशी मागणी नागरिक करत आहेत.