जाहिरातीसाठी संपर्क करा
11 September 2026
← मुख्यपृष्ठ
आरोग्य ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 08 September 2026

देहू नगरपंचायत हद्दीतील तुंबलेली गटारे साफ करा भाजपची मागणी

जेट प्रेशर व्याक्युम सेक्शन वाहनाचा वापर सुरू करण्यासाठी ऑपरेटर आपल्याकडे उपलब्ध नाही लवकरच ऑपरेटरची नेमणूक करून व्यवस्था करण्यात येईल- आरोग्य विभाग प्रमुख कविता पाटील.

देहू: देहू नगरपंचायत हद्दीतील विविध भागातील भूमिगत गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे तेथील सांडपाणी रस्त्यावर आणि नागरिकांच्या घराबाहेर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. सांडपाण्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत.यावर देहू नगरपंचायत प्रशासनाने ताबडतोब उपायोजना करावी आणि शासनाकडून मिळालेल्या जेट प्रेशर व्याक्युम सेक्शन वाहनाचा वापर ताबडतोब सुरू करावा ,अशी मागणी देहू शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने देहू नगरपंचायतचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्याकडे मंगळवारी( ता. 8) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, सागर मुसुडगे, शुभम पाटील गणेश खंडागळे रोहित मोरे ,माऊली काळोखे, शिवाजीराव बोत्रे व इतर उपस्थित होते.
काही भागात गटारे चोकअप होता पंधरा दिवस आणि महिनाभर ती गटारे साफ केली जात नाही, असा आरोप प भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.तसेच देहू नगरपंचायतीला शासनाच्या माध्यमातून आलेली जेट प्रेशर व्याक्युम सेक्शन वाहन मिळालेले आहे. त्याचाही वापर करण्यात येत नाही . नागरिकांच्या सोयीसाठी हे वाहन रुजू करावे ,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.