जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 28 September 2026

ज्ञानेश्वरी प्रतिशुध्दी तिथीनिमित्त आळंदीत चार दिवसीय कीर्तन महोत्सव

ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून भक्ती, ज्ञान आणि वारकरी परंपरेचा जागर घडविणाऱ्या या कीर्तन महोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा

आळंदी : वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीच्या माध्यमातून श्रीक्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्री ज्ञानेश्वरी प्रतिशुध्दी तिथीनिमित्त चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाची सुरुवात आज पहाटे ५ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना अभिषेक करून तसेच ज्ञानेश्वरीचे विधिवत पूजन करून करण्यात आली. यानंतर ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचनास सुरुवात झाली.
महोत्सवात दररोज ज्ञानेश्वरी पारायण व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत कीर्तनसेवा होणार आहे.
कीर्तनाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
दि. २७ सप्टेंबर २०२६ — ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे
दि. २८ सप्टेंबर २०२६ — ह.भ.प. उमेश महाराज दशरथे
दि. २९ सप्टेंबर २०२६ — ह.भ.प. माऊली महाराज कदम
दि. ३० सप्टेंबर २०२६ — सकाळी १० ते १२ — काल्याचे कीर्तन, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे
या कार्यक्रमास ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, व्यासपीठ नेतृत्व एकनाथ कोष्टी महाराज, बाळासाहेब खरमाळे महाराज यांच्यासह वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीचे सश पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी विजय आण्णा जगताप, आर. के. रांजणे, सुरेश भोईर, तानाजी काळभोर, विजय जगताप, बाळासाहेब विनोदे, धोंडिबा मामा भोंडवे, धारूमामा बालवडकर, दत्तात्रय भोंडवे, संजय भिसे, राजेंद्र जगताप, जगन्नाथ नाटक पाटील, सुधीर ढगे, कैलास कातळे, इंद्रसिंग राजपूत, योगेश काळभोर आदी उपस्थित होते.
ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून भक्ती, ज्ञान आणि वारकरी परंपरेचा जागर घडविणाऱ्या या कीर्तन महोत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.