जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 20 September 2026

देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस ,गणेशोत्सवानिमित्त स्व. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा

स्वर्गीय अजित पवार यांच्या वतीने मावळ तालुक्याला भरपूर निधी देण्यात आला .अनेक विकास कामे झाली.

देहूरोड : देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त स्व अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. स्वर्गीय अजित पवार यांच्या विविध कामांच्या आठवणी देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखाव्याच्या स्वरूपात पक्ष कार्यालयात मांडण्यात आलेल्या आहेत.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तानाजी काळभोर, नंदकुमार काळोखे, बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली .
यावेळी सुधीर ढगे पाटील, इंद्रसिंग राजपूत, बाळासाहेब आवंढे, रविभाऊ पवार, सुभाष चांडालिया, संदीप बहोत,प्रकाश काळे,निलेश टाक व इतर उपस्थित होते.
शहराध्यक्ष ॲड. प्रविण झेंडे व सुमित गायकवाड यांच्यावतीने पक्ष कार्यालयात नियोजन करण्यात आले आहे.
या वेळी देहूगाव मधील विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन नंदकुमार काळोखे यांचा देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला.