जाहिरातीसाठी संपर्क करा
11 September 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 11 September 2026

देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण ,पंचवार्षिक मध्ये दुसऱ्यांदा निवड

देहू नगरपंचायत नगराध्यक्षपदी प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान आणि दोनदा नगराध्यक्ष होण्याचा मान स्मिता चव्हाण यांना मिळाला आहे.

देहू : देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदी शुक्रवारी(ता.11) झालेल्या निवडणुकीत स्मिता चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
स्मिता चव्हाण यांची ही दुसऱ्यांदा निवड होत असून पुढील सहा महिन्यासाठी ही निवड आहे. निवड जाहीर होताच स्मिता चव्हाण यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून मिरवणूक काढली.
विद्यमान नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता . देहू नगरपंचायत कार्यालया मध्ये शुक्रवारी विशेष सभा घेण्यात आली. हवेलीचे
प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने पिठासन अधिकारी होते. स्मिता चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने प्रांताधिकारी यशवंत माने यांनी स्मिता चव्हाण यांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
यावेळी देहू नगर पंचायतचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, उपनगराध्यक्ष योगेश काळोखे, गटनेते योगेश परंडवाल, पूजा दिवटे ,पूनम काळोखे, रसिका काळोखे, ज्योती टिळेकर नगरसेवक आदित्य टिळेकर व इतर उपस्थित होते.
देहू नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक हाती सत्ता आहे. 17 पैकी 17 नगरपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. विद्यमान नगराध्यक्षा पूजा दिवटे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या या पदावर नगराध्यक्ष पदी माजी नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांची वर्णी पुन्हा लागणार हे जवळजवळ निश्चित होते. देहू नगरपंचायत चे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी महिलांसाठी राखीव आहे. सुरुवातीचे दीड वर्ष स्मिता चव्हाण या नगराध्यक्षपदी होत्या .त्यानंतर पूजा दिवटे या नगराध्यक्षपदी राहिल्या. उर्वरित सहा महिन्यांसाठी स्मिता चव्हाण यांची पुन्हा निवड झाली .
या निवडणुकीत केवळ 11 सदस्य उपस्थित होते . सहा नगरपंचायत सदस्य अनुपस्थित होते .त्यामुळे देहूतील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होती. याबाबत गटनेते योगेश परंडवाल यांनी सांगितले ,काही सदस्यांना कामे होती . काही बाहेरगावी गेले .त्यामुळे ते आले नसतील.