जाहिरातीसाठी संपर्क करा
02 June 2026
← मुख्यपृष्ठ
राजकारण ताज्या बातम्या वेदांत पी 27 May 2026

देशाला काँग्रेस शिवाय पर्याय नाही- जिल्हाध्यक्ष सातव

स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास काँग्रेस मुळे झाला. आगामी काळातही काँग्रेस शिवाय देशाला पर्याय नाही.

देहू: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा विकास काँग्रेस पक्षामुळे झाला.सध्या भाजपकडून विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक सुरू आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांनी देहू येथे रविवारी(ता.24) केले.
कमलाकर सातव यांची नुकतीच पुणे जिल्हा उत्तर विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली.या पार्श्वभूमीवर देहू शहर काँग्रेस च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
देहू शहर महिला काँग्रेस अध्यक्षा माया सातपुते,जेष्ठ नेते मधुकर कंद,रशीद धोंडफोडे,नंदकुमार काळे,युवा अध्यक्ष गणेश मुसुडगे,अशोक चव्हाण,नारायण चव्हाण, वनिता देशकर, अक्षय झेंडे व इतर उपस्थित होते.
माया सातपुते म्हणाल्या, आगामी काळात देहूतील नगरपंचायत मध्ये काँग्रेस ची सत्ता येण्यासाठी सर्वांनी पक्षाची भूमिका आणि कार्य मतदारांपर्यंत पोचवावे.
जिल्ह्यातील काँग्रेस चे सभासद वाढविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात देहुतून व्हावी अशी आशा मधुकर कंद यांनी व्यक्त केली.