जाहिरातीसाठी संपर्क करा
02 June 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत पी 08 May 2026

पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून दाखले वाटप

पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानर्तगंत विविध विभागातील दाखल्यांचे वाटप करण्यात आले

देहू : पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून छत्रपती शिवाजीमहाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानर्तगंत विविध विभागातील दाखल्यांचे शुक्रवारी(ता.8)वाटप करण्यात आले.शिबिरात पाचशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
पिंपरी चिंचवड चे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख ,देहू नगरपंचायत चे मुख्याधिकारी चेतन कोंडे,नायब तहसीलदार मनिषा माने, नगराध्यक्षा पुजा दिवटे,उपनगराध्यक्षा प्रियंका मोरे,सदस्या रसिका काळोखे,स्मिता चव्हाण, शिल्पा परंडवाल,सदस्य योगेश काळोखे, योगेश परंडवाल, माजी पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, महावितरणचे संतोष झोडगे, मंडलाधिकारी दिनेश नरवडे,गावकामगार तलाठी अनुष्का लोखंडे, कोतवाल संभाजी मुसुडगे व
विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
या शिबिरात सातबारा वरील प्रलंबित फेरफार निकाली काढून वाटप, सातबारा वरील चुका संदर्भात अर्ज स्वीकारण्यात आले.डिजिटल सातबारा व फेरफार वाटप करून शेतकरी ओळखपत्र मिळाले नसेल तर त्याची नोंद करण्यात आली.सुधारित तुकडे बंद दस्ताची तरतुदीनुसार नोंद, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट चे अर्ज स्वीकारणे, शालेय विद्यार्थी यांना उत्पन्न दाखले वाटप करण्यात आले. शेतकरीवर्ग यांना किसान कार्ड, रेशनकार्ड व आधार कार्ड दुरुस्त व इतर कामे करण्यात आली. महावितरण कडून सौर ऊर्जा लाभ मिळवून देण्यासाठी उप अभियंता संतोष झोडगे यांनी मार्गदर्शन केले.