जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 21 September 2026

देहू परंडवाल चौकातील कापूर ओढ्यावरील जुना पूल पाडला

परंडवाल चौकातील पुलाचे रुंदीकरण देहू नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे

देहू : देहू ते देहूरोड या पालखी मार्गावरील परंडवाल चौकातील कापूर ओढ्यावरील जृना पूल देहू नगरपंचायत प्रशासनाकडून पाडण्यात आला. देहू नगरपंचायत प्रशासनाकडून सहा कोटी रुपये खर्च करून पूलाचे रुंदीकरण येत आहे.
या पालखी मार्गावर परंडवाल चौकात पूल अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत प्रशासनाकडून पुलाचे फुलाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. साधारणपणे 30 मीटर रुंदीकरण होणार असून त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.
सुरुवातीला ठेकेदाराने जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूने दोन नवीन पूल बांधलेले आहेत. मधला जुना पूल रविवारी(ता.20) पाडण्यात आला .या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे. शेवटी तीनही पूल एकत्र करण्यात येणार आहे.