जाहिरातीसाठी संपर्क करा
02 June 2026
← मुख्यपृष्ठ
स्थानिक वेदांत 06 May 2026

खंडित वीज पुरवठा समस्येबाबत बैठकीचे आयोजन

वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.तसेच ग्राहक संख्या 17000 झालेली आहे.विजेची वाढती मागणी पाहता नवीन उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे-किरण सरोदे

देहू, : देहू नगरपंचायत हद्दीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.या पार्श्वभूमीवर त्रस्त नागरिक , देहू नगरपंचायत प्रशासन आणि नगरपंचायत सदस्यांकडून देहू नगरपंचायत कार्यालयात वीज वितरण अधिकारी यांची बुधवारी(ता.6)बैठक आयोजित करण्यात आली.
नगराध्यक्षा पुजा दिवटे, मुख्याधिकारी चेतन कोंडे,वीज वितरण कंपनीचे निगडी प्राधिकरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे देहुचे सहाय्यक अभियंता संतोष झोडगे सामाजिक कार्यकर्ते रूचिर टिळेकर व इतर उपस्थित होते.
याबाबत किरण सरोदे यांनी सांगितले, वीज समस्या चे निराकरण करणे आणि पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत . सब स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.
देहू मध्ये दिवसे दिवस मोठमोठे गृह प्रकल्प होत आहे पाच वर्षांपूर्वी सहा हजार ग्राहक होते आता 17000 ग्राहक संख्या झालेली आहे यामध्ये 1000 पेक्षा जास्त व्यापारी व उद्योगधंदे असलेले ग्राहक आहेत.