देहू: उत्सवाच्या माध्यमातून संस्कृती ,कला यांचे युवकांनी जतन करावे. तसेच समाजात एकोपा निर्माण करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सोमवारी (ता.7) येथे केले.
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश आहिरे व मित्रपरिवार यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भाऊसाहेब भोईर बोलत होते.
यावेळी पिंपरी चिंचवडचे नगरसेवक नाना काटे, देहूरोड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे,
नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, शेखर चिंचवडे ,देहू नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्ष पूजा दिवटे, देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विवेक काळोखे , नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होते. चाकण येथील भैरवनाथ गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.
या उत्सव सोहळ्यात अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि लावणी सम्राट सायली पाटील यांनी विविध गीते आणि लावणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच यावेळी महिलांसाठी ५ लकी ड्रॉ कुपन काढण्यात आले .विजेत्यांना वॉशिंग मशीन , एल. इ .डी .टीव्ही ३२ इंच , गॅस शेगडी, साउंड बार व इलेक्ट्रिक कुकर शेगडी चे वाटप करण्यात आले .या कार्यक्रमाचे आयोजन प्रथमेश आहिरे मित्र परिवार व यु जी एस ग्रुप ऑफ कंपनी यांनी केले होते.
लक्की ड्राॅ विजेते- प्रथम शामल सुर्यवंशी -वाॅशिग मशीन .
दुसरा -छाया ताई- टीव्ही .
तिसरा -शितल चौधरी गॅस शिगडी.
उत्सवातून संस्कृती ,कला यांचे युवकांनी जतन करावे. समाजात एकोपा निर्माण करावा - भाऊसाहेब भोईर
श्री. प्रथमेश भाऊ आहिरे आयोजित भव्य दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा. तरुणाई संगीताच्या तालावर थिरकली.