जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
आरोग्य ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 26 October 2026

केंद्रीय आयुध भंडार देहूरोड येथे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

डेपो वर्क्स कमिटीचा स्तुत्य उपक्रम; कामगार व अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

देहूरोड : संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय आयुध भंडार (सीओडी), देहूरोड येथे डेपो वर्क्स कमिटीच्या पुढाकाराने सोमवारी (ता. २६) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला डेपोतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन कर्नल आदित्य एरी, लेफ्टनंट कर्नल बिष्ट, लेफ्टनंट कर्नल अभिषेक शर्मा, मेजर वसंत रंजन आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेरणा भिंगानिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महर्षी वाल्मिकी व भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी सोमाटणे फाटा येथील ‘लाईफलाईन ब्लड सेंटर’चे डॉ. प्रवीण शेळके, समाधान टकले आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे विशेष सहकार्य लाभले. भारतीय सेनेला भविष्यात रक्ताची आवश्यकता भासल्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे डॉ. प्रवीण शेळके यांनी सांगितले. तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या संपूर्ण सीओडी परिवाराचे त्यांनी आभार मानले.
शिबिरात रक्तदान करणाऱ्या कामगार व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला डेपोतील कामगार, विविध युनियनचे जनरल सेक्रेटरी, जेसीएम (JCM) सदस्य, को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक तसेच डेपो वर्क्स कमिटीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डेपो वर्क्स कमिटीचे व्हाइस चेअरमन उमाकांत लीलकर आणि सेक्रेटरी संजय जगदीश डुमडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व सांस्कृतिक समितीचे सदस्य विकास बालघरे, विक्रम टकले, निलेश भेगडे, संतोष शितकल, आकाश पिल्ले आदींनी विशेष परिश्रम घेतले.