आकुर्डी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री म्हाळसाकांत विद्यालयात बी. आय .एस. स्टुडंट्स क्लब मधील विद्यार्थ्यांसाठी पहिली ऍक्टिव्हिटी स्टैंडर्ड रायटिंग कॉम्पिटिशन बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते . महाविद्यालयाचे प्राचार्य भानुदास मालुसरे, उपप्राचार्य शशिकांत सात्रस ,भारतीय मानक ब्युरोचे शाखा अधिकारी श्री. शुक्ला ,उप मुख्याध्यापिका सुरेखा पठारे पर्यवेक्षिका दीपा पारवे, विभावरी अभंग, संध्या काळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्राध्यापिका मीना आवारी, ज्योती झरेकर, पुनम कापुरे उपस्थित होत्या.
या स्पर्धेत 38 विद्यार्थी सहभागी झाले होते.
संस्कृती कलेल या विद्यार्थिनींने बी .आय .एस .ची प्रतिज्ञा म्हंटली. त्यानंतर बी .आय. एस. चे मानक गीताचे सादरीकरण करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी शिवानी राम हिने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आय .एस .च्या मेंटार वैशाली लाड यांनी केले .त्यांनी आपल्या प्रस्तावनेत बी. आय. एस. ची स्थापना ,तसेच उद्दिष्ट, तसेच बी .आय .सर्टिफिकेशन , विविध लोगो याबद्दल माहिती दिली.
बी.आय.एस.च्या समन्वयक चित्रा शिंदे यांनी बी. आय. एस ॲप केअर या संदर्भात माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती पठारे यांनी वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी तसेच बी.आय.एस केअर ॲप चा उपयोग कसा करावा ? तसेच ग्राहकांची फसवणूक टाळावी ,याबाबत सविस्तर माहिती दिली . विजेत्या स्पर्धकांना प्रथम ,द्वितीय, तृतीय क्रमांक, उत्तेजनार्थ मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्रद्धा बोरगे या विद्यार्थिने आभार मानले .
भारतीय मानक ब्युरो चे ब्रांच अधिकारी श्री .शुक्ला व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी व संशोधन व मूल्यमापन अधिकारी किरण देशपांडे यांच्या मार्गदर्शना नुसार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
श्री म्हाळसाकांत विद्यालयात बिस्किट प्रजातीकरण या विषयावर स्पर्धा
वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी .बी.आय.एस केअर ॲप चा उपयोग कसा करावा ? ग्राहकांची फसवणूक टाळावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.