सांगवी : येथील बाबुरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ अजितदादा पवार संगीत क्लबची शनिवारी (ता. 19) स्थापना करण्यात आली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव आत्माराम जाधव तसेच प्रशासन अधिकारी प्रमोद जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित शेळके, उपप्राचार्या मेघा पोटे, प्राथमिक विभागाच्या आशा बोरकर, पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघमारे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सिनेट सदस्य संतोष ढोरे, शिवाजी पाडुळे, मासूम संस्थेचे पुणे विभागीय प्रमुख सोमनाथ हुचगोळं,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका मुगुटकर उपस्थित होते.
प्रशासन अधिकारी आत्माराम जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये वृद्धी व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे कलागुण समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पोहोचावेत यासाठी अजित दादा पवार संगीत क्लब स्थापन करण्यात आला आहे . या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल. आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.
या क्लबच्या विद्यालयातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची नृत्ये सादर करून तसेच विविध गाण्यांचे स्वरामध्ये गायन करून उपस्थित पालक व रसिकांची मने जिंकली.
विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्यातील संगीत विषयक गुण वृद्धिंगत करणे यासाठी हा संगीत क्लब विद्यालयामध्ये स्थापन केला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मनीषा गुंड यांच्या "तुझं मागतो मी आता "या गीताने झाली. कार्यक्रमांमध्ये हिंदी चित्रपटातील गीत गाता चल हे गाणे विद्यालयातील प्राध्यापक संजय मेमाणे यांनी गायले. विद्यालयातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीतांचा नृत्यविष्कार केला.
क्लबचे अध्यक्ष राजेश बडगुजर यांनी आभार मानले.
अजितदादा पवार संगीत क्लबची स्थापना ,बाबुरावजी घोलप विद्यालयाचा उपक्रम
विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये वृद्धी व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये असणारे कलागुण समाजातील विविध क्षेत्रांमध्ये पोहोचावेत- आत्माराम जाधव